करदात्यांच्या संख्येत यंदा एक कोटींनी वाढ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नवी दिल्ली : प्रत्यक्ष करदात्यांच्या संख्येत यंदा तब्बल एक कोटीने वाढ झाल्याचे प्राप्तिकर खात्याने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. प्रत्यक्ष करभरणेमध्येही लक्षणीय वाढ झाली असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. 

2017-18 या आर्थिक वर्षासाठी 6.8 कोटी करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्रे (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरले आहे. गेल्या आर्थिक वर्षात 5.4 कोटी 'रिटर्न्स' दाखल झाली होती. प्राप्तिकर भरणाऱ्यांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत सातत्याने वाढ होत असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीनंतर अप्रत्यक्ष कराच्या संकलनामध्येही वाढ होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष करसंकलनामध्ये चांगली वाढ झाल्याने यंदाच्या आर्थिक नियोजनातील एक टप्पा गाठण्यास मदतच होणार आहे. 'यंदाचे करसंकलन 10 लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, अशी आमची अपेक्षा आहे. हे साध्य झाले, तर तो ऐतिहासिक टप्पा असेल', असे प्रतिपादन अर्थखात्याचे सचिव हसमुख अधिया यांनी केले. 

गेल्या डिसेंबरमध्ये 'जीएसटी'च्या उत्पन्नात घट झाली होती. मार्च महिन्याच्या आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, 'जीएसटी'चे उत्पन्न 90 हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Almost 1 crore new tax payers added in FY 2017-2018