"सीबीआय'मधील साठमारी: सीव्हीसीच्या अहवालावर वर्मांनी मांडली बाजू

 "सीबीआय'मधील साठमारी: सीव्हीसीच्या अहवालावर वर्मांनी मांडली बाजू

नवी दिल्ली-  केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) चौकशी अहवालातील निष्कर्षांबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक अलोक वर्मा यांनी आज सर्वोच्च न्यायालयात बंद लिफाफ्यातून आपले म्हणणे सादर केले. वर्मा यांच्या विरोधातील भ्रष्टाचारप्रकरणी सीव्हीसीच्या चौकशी अहवालात त्यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले होते.

सीव्हीसीच्या अहवालातील निष्कर्षांबाबत आपले म्हणणे वर्मा यांनी सोमवारी एक वाजेपर्यंत न्यायालयात बंद लिफाफ्यातून सादर करावे, असा आदेश खंडपीठाने शुक्रवारी (ता. 16) दिला होता. मात्र, त्यासाठी अधिक वेळ देण्याची विनंती वर्मा यांच्या वकिलाने खंडपीठाकडे केली. परंतु, त्यास नकार देत आजच शक्‍य तेवढ्या लवकर वर्मा यांनी आपले म्हणणे सादर करावे, असे खंडपीठाने म्हटले होते. या प्रकरणाची मंगळवारची नियोजित सुनावणी कुठल्याही परिस्थितीत पुढे ढकलली जाणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले होते. त्यानंतर तातडीने वर्मा यांनी आपले म्हणणे खंडपीठासमोर सादर केल्याची माहिती त्यांचे वकील गोपाल शंकरनारायणन यांनी दिली.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

आरोप आणि कौतुक एकाच वेळी 
सीव्हीसीच्या अहवालात वर्मा यांच्या विरोधात काही अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच, काही गोष्टींबाबत वर्मा यांचे कौतुकही करण्यात आले आहे. त्यामुळे संमिश्र निष्कर्ष असलेल्या सीव्हीसीच्या चौकशी अहवालाची प्रत वर्मा यांना देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला. सीबीआयमधील दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी असलेल्या राकेश अस्थाना यांनी वर्मा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आपल्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीव्हीसीने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करून आपला अहवाल 12 नोव्हेंबर रोजी न्यायालयाला सादर केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com