टायरमध्ये सिलिकॉन आणि नायट्रोजनही; केंद्राची‌ नवी योजना

मंगेश वैशंपायन
सोमवार, 8 जुलै 2019

देशातील मोठ्या व छोट्या वाहनांच्या टायरची निर्मिती करताना आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे रबरा बरोबरच सिलिकॉन वापरणे तसेच हवा भरताना नायट्रोजन बंधनकारक करणे याबाबतची योजना केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने आखली आहे असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना सांगितले.

नवी दिल्ली : देशातील मोठ्या व छोट्या वाहनांच्या टायरची निर्मिती करताना आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे रबरा बरोबरच सिलिकॉन वापरणे तसेच हवा भरताना नायट्रोजन बंधनकारक करणे याबाबतची योजना केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने आखली आहे असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना सांगितले.

'अपघात झाला की चर्चा करायची हा प्रघात असला तरी माझ्या मंत्रालयाने आणलेले महत्त्वाकांक्षी मोटार वाहन विधेयक अपघातांचे मूळ नष्ट व्हावे या साठीच्या महत्वाच्या तरतुदींनी संपूर्ण आहे राज्यसभेनेे वर्षभर ते अडवून धरले आहे. सरकार किंवा राजकारण बाजूला ठेवून आता तरी ते मंजूर करा', असा टोला त्यांनी विरोधी बाकांकडे पहात लगावला.

गडकरी म्हणाले की, अपघाती प्राणहानी रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा मानके बदलण्याचे ठरवले आहे मोटार वाहन विधेयकात त्याचा उल्लेख आहे आज देशातील 30% चालकांचे परवाने बोगस आहेत प्रवासी वाहने चालविण्याचे अनेकांनी प्रशिक्षणही घेतले नाही प्रमुख कारणे रोखण्यासाठी माझ्या मंत्रालयाने पुढाकार घेऊन देशभरात साडेआठशे चालक प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्याचा निर्धार केला आहे असेही गडकरी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alongwith silicon also nitrogen are in the tires says Nitin Gadkari