'सप'च्या नेत्यांनी मुलायमसिंहांना पाठिंबा द्यावा- अमरसिंह

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

माझी पक्षातील नेत्यांनी सांगणे आहे की त्यांनी नेताजींना पाठिंबा द्यावा. सध्या पक्षात जो कलह सुरु आहे, तो दुर्दैवी आहे.

लखनौ - समाजवादी पक्षात (सप) सध्या जी काही यादवी सुरु आहे ती दुर्दैवी असून, पक्षाच्या नेत्यांनी मुलायमसिंह यादव यांना पाठिंबा द्यावा असे वक्तव्य सपचे नेते अमरसिंह यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका कोणत्याही दिवशी जाहीर होण्याची शक्‍यता असताना, सत्ताधारी समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी त्यांचा मुलगा व राज्याचा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना, तसेच पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांची शुक्रवारी पक्षातून हकालपट्टी केली. आज (शनिवार) मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक होत असून, त्यानंतर सर्व नेते मुलायमसिंह यादव यांची भेट घेणार आहेत.

या पार्श्वभूमीवर अमरसिंह म्हणाले, की माझी पक्षातील नेत्यांनी सांगणे आहे की त्यांनी नेताजींना पाठिंबा द्यावा. सध्या पक्षात जो कलह सुरु आहे, तो दुर्दैवी आहे. मुलायमसिंह यांनी खूप मेहनत घेऊन पक्ष उभा केला आहे. मी यापूर्वीही सांगितले आहे मुलायमसिंहच पक्षाचे प्रमुख आहेत.

Web Title: Amar Singh asks SP members to support Mulayam Singh Yadav