अमरसिंह म्हणतात, टायगर अभी जिंदा है!

Amar Singh
Amar Singh

लखनौ : सोशल मीडियावर समाजवादी पक्षाचे  माजी नेते अमरसिंह यांच्या निधनाची अफवा पसरविण्यात येत असताना त्यांनी स्वतः ट्विट करत टायगर अभी जिंदा है असे म्हटले आहे.

अमरसिंह गेल्या काही दिवसांपासून आजारपणाशी लढत आहेत. त्यामुळे त्यांचे निधन झाल्याच्या बातम्या सोमवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. यामुळे अमरसिंह यांनी व्हिडिओ पोस्ट करून अजून मी जिवंत असल्याचे म्हटले आहे.

अमरसिंह यांनी म्हटले आहे, की सिंगापूरहून मी अमरसिंह बोलत आहे. मी आजारी असलो अजून हरलेलो नाही. मी अजून हिंमत हारलेलो नाही. माझे शुभचिंतक आणि मित्र अफवा पसरवत आहेत की यमराजाने मला बोलावून घेतले. पण, असे काही नाही. माझ्यावर उपचार सुरु असून, लवकरच मी नव्या जोशात तुमच्यासमोर येईल. माझ्या मृत्यूची वाट पाहणाऱ्यांनी वाट पाहतच रहावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com