मुलायमसिंहानी मला हिरो बनविले- अमरसिंह

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

नवी दिल्ली- समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी मला हिरो बनविले असले तरी त्यांच्यासाठी मी व्हिलन बनण्यास तयार आहे, असे पक्षाचे नेते अमरसिंह यांनी आज (सोमवार) म्हटले आहे.

अमरसिंह लंडनहून आज भारतामध्ये परतले आहे. येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'मुलायमसिंह यांनी मला हिरो बनवलिे आहे. त्यांच्यासाठी मी व्हिलन बनण्यास तयार आहे. मी त्यांच्यासोबतच असून, यापुढेही त्यांच्याबरोबरच राहणार आहे.'

'पक्षामध्ये सध्या ज्या काही घडामोडी सुरू आहेत, त्यावर मुलायमसिंह नक्कीच योग्य तोडगा काढतील. मुलायमसिंह एकदा मला म्हटले होते की, तू फक्त पक्षात नसून माझ्या हृदयात आहेस. त्यामुळे ते मला हृदयातून काढून टाकणार नाहीत. पक्षातील घडामोडींबाबत मी विचार करत नाही, असेही अमरसिंह म्हणाले.

Web Title: Amar Singh Says Mulayam 'Made Me Hero, Can Also Become Villain If Needed'