
अमरनाथ यात्रा : प्रवाशांचा 5 लाखांचा विमा, पहिल्यांदाच मिळणार RIFD कार्ड
नवी दिल्ली : कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेली अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) 30 जूनपासून सुरू पुन्हा सुरू होणार असून, 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरम्यान, ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये सर्व यात्रेकरूंना पाच लाखांचा विमा (Insurance) आणि RIFD कार्ड देण्यात येणार आहे, अशी माहिती जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य सचिवांनी दिली आहे. यावेळी शहांनी यात्रेसंदर्भातील नियम आणि व्यवस्थेबाबत जबाबदार अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तसेच आवश्यक सूचना दिल्या. (Amarnath Yatra News)
अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंना सहज दर्शन मिळावे आणि त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, ही मोदी सरकारची प्राथमिकता असल्याचे गृहमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. तसेच यात्रा मार्गावर माहितीच्या प्रसारासाठी मोबाईल टॉवर वाढवणार असल्याचे ते म्हणाले. याशिवाय अमरनाथ यात्रेकरूंची ये-जा, निवास, वीज, पाणी, दळणवळण आणि आरोग्य यासह सर्व आवश्यक सुविधांसाठी पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचनाही शहा यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रवासाच्या मार्गात कोणत्याही प्रकारची माहिती चांगल्या प्रकारे देण्यासाठी मोबाईल टॉवर वाढवणे, तसेच दरड कोसळल्यास मार्ग तातडीने खुला करण्यासाठी मशीन तैनात कराव्यात अशा महत्त्वाच्या सूचनाही शहा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हेही वाचा: महाराष्ट्रातील आमदारांना संभाजीराजेंचे खुलं पत्र; म्हणाले...
6000 फुटांपेक्षा अधिकच्या उंचीवर रुग्णवाहिका अन् हेलिकॉप्टर
या बैठकीमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले आहे. तसेच कोणत्याही आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी 6000 फूट उंचीपेक्षा अधिकच्या उंचीवर पुरेसे वैद्यकीय बेड, रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यास सांगण्यात आले आहे.
Web Title: Amarnath Yatra Amit Shah Hold High Level Meeting Gives Directions
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..