या हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

जम्मू काश्मीरमधील या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांप्रती माझी सहानुभूती आहे. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करतो. भारत अशा भ्याड व घृणास्पद हल्ल्यांपुढे झुकणार नाही.

नवी दिल्ली - शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंवर झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे झालेले दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. सर्वांनी तीव्रपणे निषेध करावा, असा हा हल्ला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
अमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर "सीआरपीएफ'च्या जादा तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात हा हल्ला झाला.

हल्ल्यानंतर मोदींनी ट्विट करत म्हटले आहे, की जम्मू काश्मीरमधील या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांप्रती माझी सहानुभूती आहे. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करतो. भारत अशा भ्याड व घृणास्पद हल्ल्यांपुढे झुकणार नाही. जम्मू काश्मीरचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली असून, शक्य ती सर्व मदत पोचविण्यात येणार आहे.

Web Title: Amarnath yatra attack pained beyond words says pm Narendra Modi