अमरनाथ यात्रेसाठी दुसरा जत्था रवाना 

पीटीआय
गुरुवार, 28 जून 2018

अमरनाथ यात्रेसाठी 3425 भाविकांचा दुसरा जत्था आज पहाटे जम्मूहून रवाना झाला. भाविक दोन गटाने रवाना झाले. पहिला गट पहाटे 3.55 वाजता भगवतीनगर येथून; तर दुसरा जत्था पहाटे 4.20 वाजता रवाना झाला. 
 

जम्मू : अमरनाथ यात्रेसाठी 3425 भाविकांचा दुसरा जत्था आज पहाटे जम्मूहून रवाना झाला. भाविक दोन गटाने रवाना झाले. पहिला गट पहाटे 3.55 वाजता भगवतीनगर येथून; तर दुसरा जत्था पहाटे 4.20 वाजता रवाना झाला. 

दोन महिने सुरू असणाऱ्या अमरनाथ यात्रेला बुधवारपासून प्रारंभ झाला. परंतु, हवामान खराब असल्याने बालतल आणि पहेलगाम मार्गावरची यात्रा थांबवण्यात आली. दोन्ही मार्गावर मुसळधार पाऊस सुरू असल्याने भाविकांना तंबूतच थांबण्याचा सल्ला दिला आहे. वातावरणात सुधारणा होईपर्यंत पुढे न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, खराब वातावरणामुळे थांबवलेली यात्रा आज दुपारी पुन्हा सुरू झाली. बालतल मार्गावरून भाविकांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली, तर पहेलगाम मार्गावरची यात्रा अद्याप स्थगित आहे. 

Web Title: Amarnath Yatra Second Batch Of 3425 Pilgrims Leave For The Cave Shrine