ऍमेझॉनकडून कॅनडात भारताच्या चुकीच्या नकाशाची विक्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

नवी दिल्ली - ऍमेझॉनकडून कॅनडामध्ये जम्मू-काश्‍मिरमधील वादग्रस्त भागाचा समावेश नसलेला नकाशा विक्रीसाठी उपलब्ध असल्याची बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली - ऍमेझॉनकडून कॅनडामध्ये जम्मू-काश्‍मिरमधील वादग्रस्त भागाचा समावेश नसलेला नकाशा विक्रीसाठी उपलब्ध असल्याची बाब समोर आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते ताजिंदर पाल एस. बग्गा यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. भारत सरकारच्या अधिकृत नकाशापेक्षा वेगळा असा व्हिनाईलचा भिंतीवर लावता येणारा नकाशा विक्री करण्यात येत आहे. बग्गा यांनी ट्विटरद्वारे ही बाब उघड केली असून त्यामध्ये अशा चुकीच्या नकाशाची विक्री तातडीने थांबविण्यात यावी असे म्हटले आहे.
'ऍमेझॉन डॉट सीएकडून भारताच्या विद्रुप केलेल्या नकाशाची विक्री करण्यात येत आहे. हे अस्वीकारार्ह्य आहे. तुमच्या संकेस्थळावरून हे हटवावे आणि अशा नकाशाची विक्री तातडीने थांबविण्यात यावी', असे ट्‌विट बग्गा यांनी केले आहे.

'भू-स्थानिक सूचना नियमन विधेयक 2016' मध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्यास 100 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे.

Web Title: Amazon Canada does it again, sells indian map without disputed territories