LokSabha 2019 : अंबानी कागदाचेही विमान बनवू शकत नाहीत; ते राफेल कसं बनविणार : राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

गांधीनगर : नरेंद्र मोदींनी उद्योगपतींची कर्ज माफ केली पण शतेकऱ्यांची नाही, नोटबंदीच्या काळात एकातरी उद्योगपतीला पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिलेले पाहिले का? या निर्यणाने केवळ सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. अशी टिका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. गुजरात मधील गांधीनगर मध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी पक्षाच्या सेक्रेटरी प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. 

राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी देशातील काही मोजक्या उद्योगपतींसाठी काम करत आहे. ज्यांना कागदाचेही विमान बनविता येत नाही अशा अनिल अंबानींना 30 हजार कोटींचा फायद्यासाठी मोदी काम करत आहेत असाही टोला त्यांनी लगावला. देशात शेतकऱ्यांचे कर्ज, बेरोजगारी अशा एकाही प्रश्नावर बोलले जात नाही. सरकार यातील एकही प्रश्न सोडविण्यात यशस्वी ठरली नाही. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये काँग्रेसचे सरकार येताच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस सत्तेवर आल्यास जीएसटी मध्ये सुधारणा करण्यात येईल. काँगेसची विचारधारा आपुलकी, बंधुभा यावर विश्वास ठेवणारी आहे. आमची गांधीची विचारधारा आहे. यामध्ये प्रेम आहे. परंतु, दुसरीकडे भाजपकडून द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. हा यो दोन्ही विचारधारांमधील फरक आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, रोजगारीचा प्रश्न, पंधरा लाख देण्याचं आश्वासन, यातील एकही गोष्ट या सरकराने पाळली नाही. मोदी म्हणाले होते मला पंतप्रधान बनवू नका मी देशाचा चौकीदार म्हणून काम करणार आहे. पण आता चौकीदार चोर आहे हेच पाच वर्षात जनतेने पाहिले असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. पुलवामा हल्ल्यातील मुख्य सुत्रधार मसुद अझहर ला भाजपच्या काळातच वातानुकुलीत विमानाने पाकिस्तानात पाठविण्यात आले होते. असा आरोपही गांधी यांनी मोदी सरकारवर केला.

प्रियंका गांधी म्हणाल्या, रोजगार, महिला सुरक्षा, कामगार या प्रश्नांवर सरकार बोलायला तयार नाही. मोदींच्या दोन कोटी रोजगाराचं काय झालं याचा जाब विचारला पाहिजे. तुमचं मत तुम्हाला मजबूत बनविणारे शस्त्र आहे याचा वापर तुम्ही योग्य ठिकाणी करावा. सत्यासोबत चालणं हा भारताचा इतिहास. याला पायदळी तुडविण्याचे काम मोदी यांच्याकडून सुरु आहे. तुमचे मतदानेचे शस्त्राचा वापर योग्य वेळी करण्याची गरज आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com