मथुरा येथे रुग्णवाहिका-कारची धडक; सात जण ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रुग्णवाहिका आणि कारची जोरदार धडक झाली. यामध्ये सात जण जागीच ठार झाले तर इतर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना मथुरा जिल्ह्यातील बलदेव परिसरात घडली. 

मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रुग्णवाहिका आणि कारची जोरदार धडक झाली. यामध्ये सात जण जागीच ठार झाले तर इतर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना मथुरा जिल्ह्यातील बलदेव परिसरात घडली. 

संबंधित रुग्णवाहिका जम्मूहून पाटण्याच्या दिशेने मृतदेह घेऊन जात होती. त्यावेळी यमुना महामार्गावरील बलदेव परिसरात रुग्णवाहिका दुभाजकावर जाऊन आदळली. त्यानंतर उलटली. नेमके त्याचदरम्यान आग्र्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या कारने रुग्णवाहिकेला जोराची धडक देत हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये सात जण जागीच ठार झाले. तर सहा जण जखमी झाले आहेत. यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य करण्यास सुरवात केली. अपघातग्रस्त वाहनांमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याचे येथील पोलिस अधीक्षक आदित्य शुक्ला यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambulance and Car Accident at Mathura Seven peoples died