क्रिप्टोकरन्सी फसवणूक अमेरिकेत तिघांना अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

क्रिप्टोकरन्सीप्रकरणी भारतीय वंशाच्या एका अमेरिकी नागरिकांसह तिघांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिकाऱ्यांनी आरोपींकडून 60 लाख अमेरिकी डॉलरहून अधिक डिजिटल चलन जप्त केले आहे. सोहराब शर्मा, रेमंड ट्रापानी आणि रॉबर्ट फर्कस हे सेंट्रा टेक नावाच्या स्टार्टअप कंपनीचे तीन सहसंस्थापक होते. 

न्यूयॉर्क - क्रिप्टोकरन्सीप्रकरणी भारतीय वंशाच्या एका अमेरिकी नागरिकांसह तिघांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिकाऱ्यांनी आरोपींकडून 60 लाख अमेरिकी डॉलरहून अधिक डिजिटल चलन जप्त केले आहे. सोहराब शर्मा, रेमंड ट्रापानी आणि रॉबर्ट फर्कस हे सेंट्रा टेक नावाच्या स्टार्टअप कंपनीचे तीन सहसंस्थापक होते. 

न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्यातील न्यायालयाने आरोपींवर कटकारस्थान करणे, डिजिटल फंडात गुंतवणूक करण्यासाठी गरजूंना भाग पाडणे असे आरोप केले आहेत. अमेरिकेचे ऍटर्नी रॉबर्ट खुजामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेत गुंतवणूकीवर व्याज देण्याचा कट रचला होता. आरोपींनी आपल्या उत्पादनाबाबत वित्त कंपन्यांशी संपर्क साधला आणि खोटे दावे केले. एवढेच नाही, तर काल्पनिक स्टार्टअप कंपनी टेकची निर्मिती केली. शर्मा, ट्रापानी आणि फर्कस हे तिघेही फ्लोरिडाचे रहिवासी असून, तिघेही दोषी आढळून आल्यास 65 वर्षांपर्यत तुरुंगवास होऊ शकतो. 

Web Title: in america Cryptocurrency Case three in jail