अवकाशात वर्चस्वासाठी अमेरिकेची "स्पेस फोर्स'; ट्रम्प यांच्याकडून घोषणा

पीटीआय
बुधवार, 20 जून 2018

अवकाशात अमेरिकेचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "स्पेस फोर्स' निर्माण करण्याचे आदेश संरक्षण विभागाला दिले आहेत. अमेरिकेच्या सैन्यदलाची ही सहावी शाखा असेल. 

वॉशिंग्टन : अवकाशात अमेरिकेचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "स्पेस फोर्स' निर्माण करण्याचे आदेश संरक्षण विभागाला दिले आहेत. अमेरिकेच्या सैन्यदलाची ही सहावी शाखा असेल. 

"अमेरिकेचे संरक्षण करण्यासाठी अवकाशात केवळ अस्तित्व असून भागणार नाही, तेथे आपले वर्चस्व निर्माण होणे आवश्‍यक आहे,' असे ट्रम्प यांनी नॅशनल स्पेस कौन्सिलच्या बैठकीवेळी सांगितले. "स्पेस फोर्स'ची नेमकी भूमिका आणि ते स्थापन होण्याचा कालावधी अद्याप निश्‍चित समजलेला नाही. "स्पेस फोर्स' स्थापण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची सूचनाही ट्रम्प यांनी केली आहे. अवकाशातील अपघात टाळण्यासाठी विशेष उपाय योजना करण्याबाबतही आदेश देणार असल्याचे ट्रम्प यांनी या वेळी सांगितले. 

अमेरिकी सैन्यदलाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या शाखा आणि त्यांची क्षमता 
1) लष्कर (जमिनीवरील लढाईसाठी) 
स्थापना : 14 जून 1775 
4.76 लाख : खडे सैन्य 
3.43 लाख : नॅशनल गार्ड 
1.99 लाख : राखीव सैन्य 
4,406 : विमाने 

2) मरिन कोअर (जमीन आणि सागरी लढाईसाठी, दूरवरील मोहिमांसाठी) 
स्थापना : 10 नोव्हेंबर 1775 
1.82 लाख : खडे सैन्य 
38.5 हजार : राखीव सैन्य 
1,304 : विमाने 
टोपणनाव : डेव्हिल डॉग्ज्‌ 

3) नौदल (सागरी मोहिमा आणि युद्धासाठी) 
स्थापना : 13 ऑक्‍टोबर 1775 
3.25 लाख : खडे सैन्य 
98.5 : हजार : राखीव सैन्य 
11 : विमानवाहू जहाजे 
480 : एकूण जहाजे 
3700 : विमाने 

4) हवाई दल (हवाई आणि अवकाश युद्धासाठी) 
स्थापना : 1 ऑगस्ट 1907 
3.19 लाख : खडे सैन्य 
69.2 हजार : राखीव सैन्य 
1.06 लाख : हवाई सुरक्षा कर्मचारी 
5,047 : विमाने 
406 : आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे 
170 : उपग्रह 

5) तटरक्षक दल (किनारपट्टीचे संरक्षण, सागरी कायदा अंमलबजावणी, शोधमोहिमा) 
स्थापना : 28 जानेवारी 1915 
87,569 : एकूण सैन्य 
243 : गस्ती नौका 
1650 : छोट्या बोटी 
201 : हेलिकॉप्टर व विमाने 
टोपणनाव : कोस्टीज्‌ 

Web Title: America's "Space Force" announcement from Trump