पंधरा वर्षांत अमेठीचा सिंगापूरसारखा विकास होईल : राहुल गांधी 

वृत्तसंस्था
बुधवार, 18 एप्रिल 2018

अमेठी : 'येत्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये अमेठीचा इतक्‍या वेगाने विकास होईल, की जगभरातील लोक सिंगापूर आणि कॅलिफोर्नियाच्या जोडीनं अमेठीचे नाव घेतील', असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी 2004 पासून अमेठीचे खासदार आहेत. 

अमेठीच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. 'नेहरुजी किंवा वाजपेयीजींशी सध्याच्या पंतप्रधानांची तुलना करा.. ते दोघेही भविष्याबद्दल बोलत असत. पण सध्याचे पंतप्रधान कायम भूतकाळाकडेच बघत असतात.. हे कायम द्वेषच पसरवत असतात', अशी टीका राहुल यांनी केली. 

'अमेठीच्या विकासासाठी आम्ही इथे आयआयटी, मेगा फूड पार्क आणि पेपर मिलसारखे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला. पण भाजपप्रणित 'एनडीए'ने हे सर्व प्रकल्प अमेठीतून बाहेर नेले. या प्रकल्पांमुळे हजारो युवकांना रोजगार मिळाला असता', असा दावाही राहुल यांनी केला. यापैकी मेगा फूड पार्कसारखे काही प्रकल्प पुन्हा आणण्याचा प्रयत्न करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठी या पारंपरिक मतदारसंघात राहुल गांधी यांना भाजपच्या स्मृती इराणी यांच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत इराणी यांचा पराभव झाला होता; तरीही राहुल यांच्या मताधिक्‍यात लक्षणीय घट झाली होती. 2009 च्या निवडणुकीत राहुल यांना 3.70 लाखांचे मताधिक्‍य होते; तर 2014 मध्ये हाच आकडा 1.07 लाख होता. 

Web Title: Amethi will be as developed as Singapore in 15 years, says Rahul Gandhi