अमित शहा मुख्यमंत्री होणार नाहीत:वेंकय्या नायडू

बुधवार, 3 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुजरातचे मुख्यमंत्री होणार नसून त्यांच्या नेतृत्वाची पक्षाला गरज असल्याची माहिती केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली. 

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुजरातचे मुख्यमंत्री होणार नसून त्यांच्या नेतृत्वाची पक्षाला गरज असल्याची माहिती केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली. 

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पाठविलेला राजीनामा आज (बुधवार) भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नायडू म्हणाले, "गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबाबत गुरुवारी निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री होणारा व्यक्ती हा गुजरातमधील असेल आणि तो आमदार असेल.‘ मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच याबाबत कोणतीही चर्चा नसल्याचेही ते म्हणाले. राजधानी दिल्लीत झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि वेंकय्या नायडू उपस्थित होते. 

गुजरातमध्ये नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्याच्या प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच सरोज पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी हे दोन्ही नेते गुरूवारी गुजरातमध्ये जाणार आहेत.

Web Title: amit

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी