शहरी नक्षलवाद्यांचे राहुल समर्थन करताहेत: अमित शहा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

रायपूर (छत्तीसगड): "पंतप्रधानांच्या हत्येचा कट करणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी समर्थन करत आहेत. त्यांनी जनतेसमोर भूमिका स्पष्ट करावी,' असे आवाहन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज केले. महाराष्ट्र पोलिसांनी गेल्या महिन्यात नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर शहा यांनी राहुल यांना लक्ष्य केले.

येथील पक्ष कार्यकर्त्यांना अमित शहा यांनी मार्गदर्शन केले. "आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विजयाची स्वप्ने राहुलबाबा पाहत आहेत. मात्र त्यांचे हे दिवास्वप्न आहे. "राहुल गांधी आणि कंपनी' हे पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शहरी नक्षलवाद्यांचे समर्थन करतात. पंतप्रधानांना मारण्याचा कट रचणाऱ्यांना अटक करायला नको? राहुल यांनी शहरी नक्षलवादाबाबत त्यांची भूमिका जनतेसमोर स्पष्टपणे मांडावी,' असे शहा म्हणाले. छत्तीसगड विधानसभेतील 90 जागांपैकी 65 जागांवर विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करा, त्याहून कमी जागा मिळणे म्हणजे विजय नव्हे, असे समजावे, असे शहा पक्ष कार्यकर्त्यांना म्हणाले. सध्या येथे भाजपचे 49 आमदार आहेत.

Web Title: Amit Shah accuses Rahul Gandhi of supporting urban Naxals