
Amit Shah : कम्युनिस्टांनी शेकडो काँग्रेसींची हत्या केली, त्यांच्यासोबतच...; अमित शहांचा हल्लाबोल
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी (१२ फेब्रुवारी २०२३) त्रिपुरातील चांदीपूर येथे निवडणूक रॅलीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर जोरदार निशाणा साधला. अमित शहा म्हणाले की, डावे आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. डाव्यांनी हे मान्य केले की ते भाजपशी एकटे लढू शकत नाहीत. (Amit Shah news in Marathi)
शहा पुढं म्हणाले की, काँग्रेसचं कराव तरी काय? शेकडो काँग्रेसजनांना मारणाऱ्या कम्युनिस्टांसोबत आज काँग्रेसचं इलू इलू सुरू आहे, असा टोला शहा यांनी लगावला.
काँग्रेससोबत युती करून सीपीआय(एम)ने हे सिद्ध केले आहे की ते निवडणुकीत पराभूत होणार आहेत. त्यांना एकट्याने भाजपचा सामना करता आला नाही. सीपीआय(एम) सोबत युती केल्याबद्दल शहा म्हणाले, काँग्रेसला लाज वाटयला हवी, ज्यांनी त्यांच्या अनेक सदस्यांचा बळी घेतला, त्यांच्यासोबतच ते युती करत आहेत.
त्रिपुराच्या विकासाबाबत अमित शहा म्हणाले की, काँग्रेस आणि माकपने त्रिपुरासाठी काहीही केले नाही. त्रिपुरामध्ये भाजपच्या राजवटीत विकास झाला. सर्वांच्या विकासासाठी आम्ही काम केले. काँग्रेस आणि माकपने आदिवासींसाठी काहीही केले नाही आणि आता त्यांनी आदिवासींची मते मिळविण्यासाठी आदिवासी चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी निवडला आहे.