Modi Cabinet : बेरोजगारीचेच आव्हान; नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप

Modi Cabinet : बेरोजगारीचेच आव्हान; नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील "नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत असताना मार्ग काढावा लागेल. गृह, संरक्षण, कृषी, वाणिज्य आणि शिक्षणासारख्या मंत्रालयांसमोरील आव्हानेही कठीण आहेत. नव्याने स्थापन करण्यात आलेले जलशक्ती मंत्रालय हे सरकारचे वैशिष्ट्य ठरणार आहे. 

मोदी-शहा यांच्यातील अनेक टप्प्यांच्या चर्चेनंतर खातेवाटप आज जाहीर झाले. सरकारमधील क्रमांक दोनचे गृह मंत्रालय शहा यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. राजनाथसिंह यांची गृह मंत्रालयातून संरक्षण मंत्रालयात बदली झाली असून, अरुण जेटली यांच्या विश्‍वासू निर्मला सीतारामन अर्थमंत्री म्हणून जेटलींच्या उत्तराधिकारी ठरल्या आहेत. त्या देशाच्या इतिहासातील पहिल्या पूर्णकालीन अर्थमंत्री आहेत. सुषमा स्वराज यांनी सांभाळलेल्या परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी नव्या मंत्रिमंडळातील सर्वांत चर्चेचा विषय ठरलेले माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याकडे अपेक्षेनुसार सोपविण्यात आली आहे. गृह वगळता उर्वरित चारही मंत्रालये देशासमोरील संकटकाळात अतिशय महत्त्वाची भूमिका असलेल्या "सीएसएस' गटात मोडतात. 

नवे जलशक्ती मंत्रालय 
देशातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे हा या नव्या मंत्रालयाच्या स्थापनेचा मुख्य हेतू आहे. जलस्रोत, नद्यांचे शुद्धीकरण आणि गंगेची स्वच्छता हे विषयही या मंत्रालयांतर्गत आणण्यात आले आहेत. स्वच्छतेचा विषय याच मंत्रालयाच्या अखत्यारित येईल. सर्व नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचे आश्‍वासन मोदी यांनी प्रचारादरम्यान दिले होते. हे नवे मंत्रालय त्याची पूर्ती मानले जाते. 

मंत्रिमंडळाचं खातेवाटप पुढीलप्रमाणे 
कॅबिनेट 

नरेंद्र मोदी ः पंतप्रधान, अणुऊर्जा, अवकाश आणि महत्त्वाची धोरणे 
अमित शहा ः गृहमंत्री 
निर्मला सीतारामन ः अर्थ आणि कंपनी व्यवहार 
राजनाथ सिंह ः संरक्षणमंत्री 
नितीन गडकरी ः दळवळणमंत्री आणि सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगमंत्री 
पीयूष गोयल ः रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग 
स्मृती इराणी ः महिला बालविकास आणि वस्त्रोद्योग 
एस. जयशंकर ः परराष्ट्रमंत्री 
नरेंद्रसिंह तोमर ः कृषी, ग्रामीण विकास आणि पंचायतराज 
प्रकाश जावडेकर ः पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि माहिती प्रसारण 
रमेश निशंक ः मनुष्यबळ विकास 
रवीशंकर प्रसाद ः कायदा आणि न्याय, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान 
अर्जुन मुंडा ः आदिवासी विकास 
हर्ष वर्धन ः विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पृथ्वी विज्ञान 
धर्मेंद्र प्रधान ः पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद 
डी. व्ही. गौडा ः रसायने आणि खते 
रामविलास पासवान ः अन्न व पुरवठा, ग्राहक संरक्षण 
हरसिमरत कौरबादल ः अन्न प्रक्रिया 
थावरचंद गेहलोत ः सामाजिक न्याय आणि सबलीकरण 
मुक्तार अब्बास नक्वी ः अल्पसंख्याक 
प्रल्हाद जोशी ः संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण 
महेंद्रनाथ पांडे ः कौशल्य विकास आणि उद्योजकता 
अरविंद सावंतः अवजड उद्योग 
गिरिराज सिंह ः पशुसंवर्धन, दुग्ध आणि मस्त्य 
गजेंद्र सिंग शेखावत ः जल शक्ती 

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) 
संतोष गंगवार : कामगार आणि रोजगार 
इंद्रजीत सिंह : सांख्यिकी, योजना कार्यान्वयन आणि नियोजन 
श्रीपाद नाईक : आयुष, संरक्षण राज्यमंत्री 
जितेंद्र सिंह : ईशान्य भारत विकास, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, अणूशक्ती विकास, अवकाश संशोधन 
किरन रीजिजू : क्रीडा आणि युवा कल्याण, अल्पसंख्याक 
प्रल्हादसिंह पटेल : सांस्कृतिक आणि पर्यटन 
आर. के. सिंह : ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, कौशल्यविकास आणि उद्योजकता 
हरदीपसिंह पुरी : गृहनिर्माण आणि नगरविकास, हवाई वाहतूक, वाणिज्य उद्योग 
मनसुख मांडवीय : जल वाहतूक, रसायन आणि खते 

राज्यमंत्री 
फग्गनसिंह कुलस्ते : पोलाद 
अश्विनीकुमार चौबे : आरोग्य आणि कुटुंब कल्याण 
अर्जुन मेघवाल : संसदीय कार्य आणि अवजड उद्योग 
व्ही. के. सिंह : भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग 
क्रिशन पालः सामाजिक न्याय 
कृष्णपाल गुर्जर : सामाजिक न्याय 
रावसाहेब दानवे : ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा 
किशन रेड्डी : गृह 
पुरुषोत्तम रुपाला : कृषी 
रामदास आठवले : सामाजिक न्याय 
साध्वी निरंजन ज्योती : ग्रामविकास 
बाबुल सुप्रियो : वने, पर्यावरण 
संजीव कुमार बालियान : पशुपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग 
संजय धोत्रे : मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान 
अनुराग ठाकूर : अर्थ आणि कंपनी व्यवहार 
सुरेश अंगडी : रेल्वे 
नित्यानंद राय : गृह 
रतनलाल कटारिया : जलशक्ती आणि सामाजिक न्याय 
व्ही. मुरलीधरन : परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज 
रेणुका सिंह सरुता : आदिवासी विकास 
सोमप्रकाश : वाणिज्य आणि उद्योग 
रामेश्वर तेली : अन्नप्रक्रिया उद्योग 
प्रतापचंद्र सारंगी : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि पशुपालन, दुग्धविकास, मत्सोद्योग 
कैलाश चौधरी : कृषी 
देबश्री चौधरी : महिला आणि बालकल्याण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com