अमित शहा म्हणाले, येडियुरप्पा 'मोस्ट करप्टेड'

मंगळवार, 27 मार्च 2018

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याऐवजी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांनाच सर्वात भ्रष्टाचारी असे संबोधले. यामुळे सोशल मिडीयातून याची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडविण्यात येत आहे. तर, काँग्रेसने सत्य बाहेर आल्याचे म्हटले आहे.

बंगळूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याऐवजी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांनाच सर्वात भ्रष्टाचारी असे संबोधले. यामुळे सोशल मिडीयातून याची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडविण्यात येत आहे. तर, काँग्रेसने सत्य बाहेर आल्याचे म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा कर्नाटक दौऱ्यावर असून, त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करण्याऐवजी येडियुरप्पा यांचेच नाव घेतले. अमित शहा यांची जिभ घसरल्याने ते येडियुरप्पा सर्वाधिक भ्रष्टाचारी नेते असल्याचे म्हटले. नेमका हाच मुद्दा हेरून तेवढाच व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल करण्यात आला. 

शहा यांनी नुकतीच सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकारांच्या यादीत कर्नाटक सरकारचा नंबर पहिला असल्याचे म्हटले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा व्हिडिओ ट्विट करत म्हटले, की सतत खोटे बोलणारे शहा अखेर खरे बोलले. थँक यू अमित शहा.

येडियुरप्पा यांना 2011 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला होता. आता याच येडियुरप्पा यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. कर्नाटकमध्ये 12 मे रोजी मतदान होणार असून, 15 मे रोजी निकाल लागणार आहे.

Web Title: Amit Shah Calls BJP's Yeddyurappa Most Corrupt