निकाल लागताच शिवसेनेने रंग बदलले - अमित शहा

सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्रिपदाची लालूच दाखवून शिवसेनेचा पाठिंबा घेणे ही खरेदी-विक्री नाही काय, असा सवाल भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. 

नवी दिल्ली - मुख्यमंत्रिपदाची लालूच दाखवून शिवसेनेचा पाठिंबा घेणे ही खरेदी-विक्री नाही काय, असा सवाल भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

‘शरद पवार व सोनिया गांधी यांनी एकदा म्हणावे की मुख्यमंत्री आमचा होईल व नंतर शिवसेनेचा पाठिंबा मिळवून दाखवावा,’ असे उघड आव्हान त्यांनी दिले. महाराष्ट्रात मध्यरात्रीचा खेळ करून सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नात भाजप सपशेल तोंडघशी पडल्यावर शहा यांनी आज प्रथमच ‘ट्‌विटर’द्वारे यावर मतप्रदर्शन केले. दोन्ही काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय शिवसेनेने व त्या दोन्ही पक्षांनीही केवळ सत्तेच्या लालसेपोटीच केला व ही खरेदी विक्रीच आहे, असे शहा म्हणाले.

कोणताही गुन्हा मागे नाही 
अजित पवार यांना फोडल्याबाबत शहा म्हणाले, की अजित पवार यांना राष्ट्रवादीचा गटनेता म्हणून निवडले गेले होते. राष्ट्रवादीने पहिल्यांदा सरकार बनविण्याबाबत असमर्थता व्यक्त केली, तेव्हाही अजित पवार यांच्याच सहीचे पत्र दिले. त्यांनी पाठिंब्याचे पत्र आणल्यावरच आम्ही सरकार बनविण्याची पावले टाकली. अजित पवारांविरुद्धचा कोणताही गुन्हा मागे घेतलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah criticized Shiv Sena