कर्नाटकात काँग्रेसच्या काळात कायद्याचे तीनतेरा : अमित शहा

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

कर्नाटकातील बंगळुरुत सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण 150 टक्के वाढले आहे. राज्यात काँग्रेसची पाच वर्षे सत्ता होती. मी कर्नाटकात यात्रा केली. राज्यातील 500 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यावर सिद्धरामय्या सरकार उत्तर देत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट बनली आहे.

बंगळुरू : सिद्धरामय्या सरकार स्वतंत्र भारताचे सर्वात बिनकामी सरकार आहे. कर्नाटकात काँग्रेसच्या काळात कायद्याचे तीनतेरा वाजले आहेत. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सत्ताधारी काँग्रेस आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधला.

siddharammayya

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावत आहे. तत्पूर्वी अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. यावर सरकारचे नियंत्रण नाही. एखाद्या आमदाराच्या मुलाकडून मारहाण केली जाते आणि जेव्हा याबाबतची तक्रार द्यायला गेल्यास ती घेतली जात नाही. तसेच अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला जातो. मात्र, यातील आरोपी पकडले गेल्यास तोपर्यंत तिची हत्या किंवा तिने आत्महत्या केलेली असते. 

कर्नाटकातील बंगळुरुत सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण 150 टक्के वाढले आहे. राज्यात काँग्रेसची पाच वर्षे सत्ता होती. मी कर्नाटकात यात्रा केली. राज्यातील 500 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यावर सिद्धरामय्या सरकार उत्तर देत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट बनली आहे.

Web Title: Amit Shah Criticizes Congress and Karnataka Government