CAA : प्रियांका-राहुल यांनी दंगली घडविल्या; अमित शहा यांचा आरोप

वृत्तसंस्था
रविवार, 5 जानेवारी 2020

- 'सीएए'ला विरोध करणाऱ्यांवर टीका 

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत जनतेची दिशाभूल केल्यानेच हिंसाचाराला चिथावणी मिळाली, असा थेट आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे अध्यक्ष असलेल्या अमित शहा यांनी येथील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. शहा यांनी नानकाना साहिब गुरुद्वारावरील दगडफेकीचा उल्लेख करत पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांना भीती दाखविली जात असल्याचा आरोप केला. हा संदर्भ देत शहा यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांवर टीका केली.

अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती

ते म्हणाले,"कायद्याला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानमधील या हल्ल्याकडे पहावे. अशा घटनांमुळे तेथील घाबरलेले शीख भारतात येणार नाही तर कोठे जाणार? विरोधक मात्र कायद्याबाबत चुकीची माहिती पसरवित आहेत. गरीब आणि दलितांना या कायद्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे आणि विरोध करणारे हे दलितविरोधी आहेत.

Image result for amit shah

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि विशेषत: राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी जनतेची दिशाभूल केल्यानेच हिंसाचाराला चिथावणी मिळाली आहे. तुम्हाला दिल्लीतही दंगली पेटविणारे सरकार हवे आहे का?'' दंगल पेटविणाऱ्यांच्या घरांना भेटी देणार असल्याचे सांगत प्रियांका गांधी यांनी दंगलखोरांचे समर्थनच केले असल्याचा दावाही अमित शहा यांनी केला.

चाळीत लहानपण गेलेल्या आव्हाडांकडे गृहनिर्माण मंत्रीपद

नवा कायदा हा नागरिकत्व देण्यासाठी असून हिरावून घेण्यासाठी नाही. त्यामुळे भारतातील कोणाही अल्पसंख्याकाने नागरिकत्व गमावण्याची भीती बाळगू नये. जनतेची काही काळ दिशाभूल करता येईल, सर्व काळ नाही, असेही शहा म्हणाले. 
अमित शहा यांनी केजरीवाल यांच्यावरही जोरदार टीका केली. "केजरीवाल यांनी पाच वर्षांपूर्वी जनतेची दिशाभूल करूनच सत्ता मिळविली होती, आता जनता ही चूक करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होईल, असा विश्‍वास शहा यांनी व्यक्त केला. 

सर्व बळी पोलिसांच्याच गोळीचे : अखिलेश 

सुधारित नागरिकत्व कायद्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये हिंसाचारात झालेले सर्व मृत्यू हे पोलिसांच्या गोळीबारातच झाले असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज केला. यादव यांनी आज आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या महंमद वकील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. महंमद हे आंदोलनातही सहभागी नव्हते, तर मग त्यांचा मृत्यू कोणाच्या गोळीबाराने झाला, याचा सरकारने शोध घ्यावा, अशी मागणीही अखिलेश यादव यांनी केली. 

Image result for akhilesh yadav

अजित पवारांना अर्थमंत्रीपद, तर वळसे पाटील आणि दत्ता भरणेंना 'ही' खाती

आंदोलकांना तुरुंगात टाकल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारने जनतेची माफी मागावी. सरकारचे कृत्य निंदाजनक आहे. 

- मायावती, बसप प्रमुख 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah Criticizes on Priyanka Gandhi and Rahul Gandhi on CAA Issue