अमित शहांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज

वृत्तसंस्था
रविवार, 20 जानेवारी 2019

अखेर आज सकाळी अकराच्या सुमारास स्वाईन फ्लू आजारातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अमित शहा यांची प्रकृती उत्तम असल्याचे भाजप नेते अमित मालवीय यांनी सांगितले.

नवी दिल्ली : स्वाईन फ्लूमुळे एम्स रुग्णालयात उपचार सुरु असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आज (रविवार) डिस्चार्ज देण्यात आला.

अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) बुधवारी दाखल करण्यात आले होते. मला स्वाइन प्लूची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असून, उपचार सुरू आहेत. ईश्वराचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांच्या बळावर मी लवकरच बरा होईन,' असे शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. 'एम्स'चे संचालक रणदीप गुलेरिया यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्‍टरांचे एक पथक शहा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. 

अखेर आज सकाळी अकराच्या सुमारास स्वाईन फ्लू आजारातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अमित शहा यांची प्रकृती उत्तम असल्याचे भाजप नेते अमित मालवीय यांनी सांगितले.

Web Title: Amit Shah, Diagnosed With Swine Flu, Discharged From AIIMS