Modi Cabinet : असे असेल मोदींचे संभाव्य मंत्रिमंडळ?

Amit Shah, Narendra Modi
Amit Shah, Narendra Modi

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा आज (गुरुवार) शपथविधी होत असून, संभाव्य मंत्रिमंडळाबाबत अनेक शक्यता वर्तविण्यात येत आहेत. आज सायंकाळी सात वाजता याबाबत सर्वकाही स्पष्ट होणार आहे. मंत्रिमंडळ शपथविधीच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे बोलले जात आहे. 

मोदी व शहा यांच्यात संभाव्य मंत्रिमंडळाबाबत मंगळवारी सुमारे पाच तास मॅरेथॉन चर्चा झाली. तीत प्रामुख्याने नवे चेहरे व घटकपक्षांना द्यावयाच्या जागा याबाबत खल झाला. पहिल्या टप्प्यात मोदींसह सुमारे 40 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्‍यता आहे. नव्या मंत्रिमंडळात पश्‍चिम बंगालच्या खासदारांची व महिलांची संख्या लक्षणीय राहण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. आज शपथविधीपूर्वी पंतप्रधान मोदी राजघाट, अटलबिहारी वाजपेयी समाधी व इंडिया गेटवरील युद्धस्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व गृहमंत्री राजनाथसिंह यांना पुन्हा तीच मंत्रिपदे दिली जाण्याची शक्‍यता आहे. अरुण जेटली उपलब्ध नसल्याने सध्या अर्थमंत्रालयाचा कार्यभार सांभाळणारे पियूष गोयल यांनाच ती जबाबदारी मिळणे शक्‍य आहे. मात्र, मोदी यांच्या 'धक्कातंत्रा'नुसार राजकारणाच्या बाहेरील व्यक्तीला अर्थमंत्री नेमण्याचा 'पी. व्ही. नरसिंहराव प्रयोग' होण्याचीही चिन्हे दिसतात. गडकरी यांनी कृषिमंत्रिपद स्वीकारावे, असे पक्षनेतृत्वाचे म्हणणे आहे. मावळत्या मोदी सरकारविरुद्ध शेतकऱ्यांचा मोठा असंतोष आहे. राधामोहनसिंह यांना या पदाचा भार अजिबातच पेलता आला नव्हता. त्यामुळे गडकरी त्यांच्या स्वभावानुसार या खात्यात अमूलाग्र परिवर्तन घडवू शकतील, असे भाजप नेतृत्वाला वाटते. 

संभाव्य मंत्रिमंडळ 
जुने चेहरे :
 नितीन गडकरी, राजनाथसिंह, सुषमा स्वराज, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, जितेंद्रसिंह, नरेंद्र तोमर, सुरेश प्रभू, जे. पी. नड्डा, मुख्तार अब्बास नक्वी, निर्मला सीतारामन, हंसराज अहीर (राज्यसभेवर निवड करणार), श्रीपाद येसो नाईक, राव इंद्रजित सिंह, अनुराग ठाकूर, अनुप्रिया पटेल, हरसिमरत कौर, रामदास आठवले. 

नवे चेहरे : मीनाक्षी लेखी किंवा प्रवेश वर्मा, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, जयंतकुमार रॉय, राजू सिंह बिश्‍त, शहानवाज हुसेन, गोपाळ शेट्टी, प्रधान बरूआ, शोभा करंदलजे, सुरेश धोत्रे (भाजप) अनिल देसाई किंवा अरविंद सावंत किंवा भावना गवळी (शिवसेना) आदी. 

ताज्या आणि अचूक बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा 'सकाळ' चे मोबाईल ऍप! 
https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com