अमित शहा-अजित दोवाल यांच्यात बैठक; काश्मीरप्रश्नी चर्चा?

वृत्तसंस्था
रविवार, 4 ऑगस्ट 2019

जम्मू-काश्मीरमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासोबत बैठक घेतली.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत काश्मीर प्रश्नी चर्चा झाली असून, पुढील रणनिती ठरविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना सुरक्षेचे कारण देत सरकारने तत्काळ काश्मीर सोडण्याचा आदेश देणारे पत्रक नुकतेच प्रसिद्ध केले होते. त्यानंतर काश्मीरमधील घटनाक्रमाबाबत विविध शक्यता वर्तविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार काश्मीरमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. त्यानंतर आता अमित शहा आणि अजित दोवाल यांच्यात बैठक झाली.  

दरम्यान, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीर प्रश्नी संसदेत चर्चेची मागणी केली. त्यानंतर आता अमित शहा-अजित दोवाल यांच्यात बैठक झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah meets NSA Ajit Doval amid terror threat in Kashmir