'नागरिकत्व'वरून चिदंबरम अमित शहांना म्हणाले...

वृत्तसंस्था
शनिवार, 28 डिसेंबर 2019

लष्करप्रमुख रावत यांच्यावरही टीका

- तुमच्या कामावर लक्ष द्या

तिरुअनंतपुरम​ : नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) वरून काँग्रेसकडून जनतेला भडकावण्याचे काम केले जात आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आता थेट गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तिरुअनंतपुरम येथे आयोजित एका जाहीरसभेत चिदंबरम बोलत होते. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAA) लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. त्यानंतर देशातील विविध भागांमध्ये त्याविरोधात आंदोलने, मोर्चे काढले जात आहेत. तसेच यावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. त्यावर अमित शहा यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना चर्चेचे आव्हान दिले आहे.

कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याला काद्यांने केले मालामाल

त्यावर चिदंबरम यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर राज्यसभा आणि लोकसभेत झालेल्या चर्चा अमित शहा यांनी पुन्हा ऐकाव्यात. तसेच अमित शहा यांनी विरोधकांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही. आता तेच अमित शहा राहुल गांधी यांना चर्चेचे आव्हान देत आहेत. 

Image result for CAA

लष्करप्रमुख रावत यांच्यावरही टीका

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) याबाबत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाठिंबा देणारे विधान केले. डीजीपी आणि लष्करप्रमुख यांच्याकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन सरकारला पाठिंबा देण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, लष्करप्रमुखांनी असे आवाहन करणे हे लाजिरवाणे आहे, असेही चिदंबरम म्हणाले. 

Image result for bipin rawat

तुमच्या कामावर लक्ष द्या

लष्करप्रमुख रावत यांच्याबाबत बोलताना चिदंबरम म्हणाले, माझे जनरल रावत यांना आवाहन आहे, की तुम्ही लष्करप्रमुख आहात. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामावरच लक्ष केंद्रित करा. ज्याप्रमाणे युद्ध कसे लढावे हे लष्कराला सांगायचे आमचे काम नाही. तसेच राजकीय नेत्यांनी काय करावे हे लष्करी अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगण्याचे काम नाही.

सोयाबीनमध्ये तेजी, मक्याची मागणी वाढती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah must go back and listen to the debates of CAA in Rajya Sabha and Lok Sabha says P Chidambaram