Amit Shah : हिंडनबर्ग मुद्दावर भाजपला घाबरण्याची गरज नाही; अमित शहांचं मोठं विधान

amit shah narendra modi
amit shah narendra modifile photo

नवी दिल्ली - अदानी उद्योग समूहाबाबत हिंडनबर्गने केलेल्या दाव्यानंतर भारताचं राजकारण ढवळून निघालं आहे. यावर विरोधकांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर कडाडून टीका केली. मात्र भाजपकडून यावर कोणतही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. त्यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठं विधान केलं आहे. (Amit Shah news in Marathi)

amit shah narendra modi
BBC IT Survey : "बीबीसीनंतर हिंडेनबर्गवर ईडीचा छापा टाका" ; कोणी लगावला केंद्र सरकारला टोला?

अदानी भाजपचे मित्र आहेत. त्यांनाच सर्वाधिक कॉन्ट्रॅक्ट मिळत आहेत. यावर अमित शहा म्हणाले की, हिंडनबर्ग प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. त्यामुळे यावर बोलणं योग्य होणार नाही. मात्र या प्रकरणावर भाजपला काहीही लपविण्याची आणि घाबरण्याची गरज नाही.

शहा पुढं म्हणाले की, भाजपवर एकही आरोप कोणीही करू शकलं नाही. उलट काँग्रेसच्या काळात १२ लाख कोटींच्या घोटाळ्यांची कोर्टाने दखल घेतली होती. भाजपने सर्व यंत्रणा ताब्यात घेतल्या. त्यामुळे चौकशी होऊ शकत नाही या विरोधकांच्या आरोपांवर शहा म्हणाले की, तुम्ही न्यायालयात जा, न्यायालय आमच्या ताब्यात नाही. पेगासेसच्या बाबतीतही असंच झालं. त्यामुळे यावर आपण काही बोलणार नाही. विरोधकांना केवळ गोंधळ घालायचा आहे, असंही ते म्हणाले.

amit shah narendra modi
मुझे प्यार हुआ....नवनीत राणा रोमँटिक, पतीदेव लाजले, Video Viral

नरेंद्र मोदी यांच्यावर २००२ पासून अशाचप्रकारे आरोप करण्यात आले आहेत. मात्र मोदी दरवेळी खरे ठरतात, ते सुर्यासारखे तेजस्वी होऊन समोर आले आहेत. उलट अधिक पाठिंबा मिळवून मोदी पुढं आल्याचं शहा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com