बटन एवढ्या जोरात दाबा की, शाहीनबागमध्ये झटका बसला पाहिजे : शहा

Amit Shah
Amit Shah

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोर धरू लागला असून, अनेक मुद्द्यांवर प्रचार करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका प्रचारसभेत म्हटले, की ईव्हीएमवरील बटन एवढ्या जोरात दाबा की शाहीनबागमध्ये झटके बसले पाहिजेत.

दिल्लीत फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार असून, सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये प्रमुख लढत होत आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए) देशभरात आंदोलने सुरु आहेत. दिल्लीतील शाहीनबाग येथे गेल्या काही दिवसांपासून महिला आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाची देशभर चर्चा होत असताना, आता अमित शहा यांनी हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात आणला आहे.

बाबरपूर येथे प्रचारसभेत बोलताना शहा म्हणाले, की ईव्हीएमवरील बटन एवढ्या रागात दाबा की त्याचा झटका शाहीनबागमध्ये बसलेल्यांना लागला पाहिजे. या झटक्यामुळे तेथे बसलेले आंदोलनकर्ते जागा सोडून गेले पाहिजेत. दिल्लीत भाजप सत्तेत आल्यास शाहिनबागसारख्या अनेक घटना रोखता येतील. भाजप उमेदवारांनाच मत देऊन तुम्ही देशाला आणखी सुरक्षित करा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com