'कर्नाटकातले लोक आता चूक करणार नाहीत'- अमित शहा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 मार्च 2018

पत्रकार परिषदेत बोलताना शहा चुकून म्हणाले की, 'भ्रष्टाचारी सरकारची कधी स्पर्धा लावली तर, येडीयुरप्पा सरकार पहिले येईल.' शहा त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराबद्दल बोलल्याने त्यांच्यावर बरीच टिका झाली. त्यानंतर आज मैसूरमध्ये बोलताना ते म्हणाले की, 'जीभ घसरल्याने मी चुकीचं बोलून गेलो. पण कर्नाटकातले लोक आता ही चूक परत करणार नाहीत.' 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे कर्नाटकातील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरल्याने चहूबाजूने टिका होत आहे. 'सिध्दरामय्यांचे सरकार भ्रष्टाचारी आहे' असे म्हणायच्या ऐवजी 'येडीयुरप्पांचे सरकार भ्रष्टाचारी आहे' असे शहा म्हणाले होते. यामुळे काँग्रेसनेही त्यांना लक्ष केले होते.  

मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना शहा चुकून म्हणाले की, 'भ्रष्टाचारी सरकारची कधी स्पर्धा लावली तर, येडीयुरप्पा सरकार पहिले येईल.' शहा त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराबद्दल बोलल्याने त्यांच्यावर बरीच टिका झाली. त्यानंतर आज मैसूरमध्ये बोलताना ते म्हणाले की, 'जीभ घसरल्याने मी चुकीचं बोलून गेलो. पण कर्नाटकातले लोक आता ही चूक परत करणार नाहीत.' 

जेव्हा शहांनी हे वक्तव्य केले, त्याचवेळी येडीयुरप्पांनी त्यांचे वाक्य सुधारण्याचा प्रयत्न केला होता, पण तोपर्यंत शहा चुकीचं बोलून गेले होते. येडीयुरप्पा हे आगामी मुख्यमंत्री पदासाठी भाजपचे उमेदवार आहेत, तर सिध्दरामय्या हे काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

यावरव राहुल गांधी व काँग्रेसच्या इतर नेत्यांनी या वक्तव्यावर टिका करायची व अमित शहांची मजा बघायची संधी अजिबात सोडली नाही. 'भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी येडीयुरप्पा सरकारला भ्रष्ट म्हणून प्रचाराची सुरवात अगदी योग्य केली आहे.' अशा आशयाचे ट्विट राहूल गांधी यांनी केले. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी 'अखेरीस शहा खरं बोलले' असे म्हणत टिका केली. 

या सर्व प्रकारानंतर येडीयुरप्पा यांनी अमित शहा हे सर्व चुकून बोलले असल्याचे स्पष्टीकरण दिले. 12 मे च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहा हे दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत.

Web Title: Amit Shah says I may have made a mistake but Karnataka people wont