भाजपा आहे तोपर्यंत हिंदु-लिंगायत विभाजन होणार नाही - अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

कर्नाटकातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने लिंगायत समुदायास धार्मिक अल्पसंख्यांक व स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. काँग्रेस सरकारच्या या निर्णयाला भाजप कडून विरोध होत आहे. 

लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा आणि अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून विविध लिंगायत समितींतर्फे आंदोलन करण्यात आले. पण लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याकाचा दर्जा देणे म्हणजे हिंदूंचे विभाजन करणे होईल, असे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले. कर्नाटकातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने लिंगायत समुदायास धार्मिक अल्पसंख्यांक व स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. काँग्रेस सरकारच्या या निर्णयाला भाजप कडून विरोध होत आहे. 

लिंगायत समाजाचे विभाजन होऊ देऊ नका अशी लिंगायत समाजातील अनेक महंतांची मागणी आहे. 'जोपर्यंत भाजपा आहे तोपर्यंत कोणतेही विभाजन होणार नाही, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची शिफारस केंद्र सरकार मान्य करणार नाही,' असे महंतांसोबत बोलताना अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. 

येत्या मे महिन्यात कर्नाटकात निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात भाजप आपले पाय रुजवू पाहत आहे. शाह यांनी कर्नाटकातील लोकांना उद्देशून म्हटले आहे की, जर भाजप येत्या निवडणूकीत विजयी झाले तर येडीयुरप्पा यांना ते कर्नाटकचे मुख्यमंत्री करतील. येडीयुरप्पा हे लिंगायत समाजाचे पुढारी मानले जातात. लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा मिळावा यासाठी आता हट्ट धरुन बसलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए-2) सरकारने 2013 मध्ये लिंगायत समुदायास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे उघड झाले होते. त्यामुळे सध्या दोन्ही आघाडीचे पक्ष कर्नाटकाची सत्ता हाती यावी म्हणून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडणार नसल्याचे चित्र दिसत आहे.      

संबंधित बातम्या -

 

 

Web Title: Amit Shah Speaks on Lingayat Minority Religion And Karnataka Assembly Election