Modi Cabinet : भाजपचे चाणक्य अमित शहा आता मंत्रिमंडळात!

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मे 2019

- निर्मला सीतारमन यांनाही राष्ट्रपती कोविंद यांनी शपथ दिली.

मोदी शपथविधी :  देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार आज (गुरुवार) स्थापन झाले. त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राजनाथसिंह यांनीही शपथ घेतली. 

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगण येथे नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा शपथविधी आज संपन्न झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मोदींच्या शपथविधीनंतर नितीन गडकरी, सदानंद गौडा यांच्यासह अनेक खासदारांना शपथ देण्यात आली.

तसेच निर्मला सीतारमन यांनाही राष्ट्रपती कोविंद यांनी शपथ दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah takes Oath as Cabinet Minister