अमित शहा उद्या गोव्यात 

Amit Shah tomorrow in Goa
Amit Shah tomorrow in Goa

गोवा : गोव्लोयातील कसभा निवडणुकीचा आढावा तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे उद्या 9 फेब्रुवारीला गोवा भेटीवर येत आहेत.

यानिमित्त भाजपा गोवातर्फे अटल बूथ कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन कुजिरा - बांबोळी येथील गोवा क्रिडा प्राधिकरणाच्या (सॅग) अॅथलेटिक स्टेडियमवर संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. या संमेलनाला सुमारे 32 हजार बुथ कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे गोवा भाजपतर्फे सांगण्यात आले आहे. हे संमेलन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे असले तरी त्याकडे राज्यातील खाणी सुरू करण्यासंदर्भात काय मुद्दे शहा मांडणार आहेत याकडेही खाण अवलंबितांचे लक्ष लागून राहिले आहे. खाणी सुरू न झाल्यास खाण लोकमंचने भाजपविरोधात प्रचार करण्याचा इशारा दिलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com