अमित शहांनी जाणून घेतल्या लक्ष्यद्विपच्या मच्छीमारांच्या समस्या

पीटीआय
गुरुवार, 18 मे 2017

शहा यांनी अब्दुल कादीर या मच्छीमाराच्या घरी इडली डोश्‍यासह हलव्याचा नाश्‍ता केला, असे सूत्रांनी सांगितले. अमित शहा मंगळवारपासून तीन दिवसांच्या लक्ष्यद्विपच्या दौऱ्यावर आले आहेत

अंद्रोथ - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज केंद्रशासित प्रदेश लक्ष्यद्विपच्या दौऱ्यावर असून, त्यांनी अंद्रोथ बेटावरील दोन मच्छीमारांच्या घरी भेट दिली. या मच्छीमारांकडे त्यांनी एक तास व्यतीत केला आणि त्यांचे क्षेमकुशल विचारले.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांनी मच्छीमारांना त्यांच्या समस्यांबद्दल आणि गरजांबद्दल चौकशी केली. शहा यांनी अब्दुल कादीर या मच्छीमाराच्या घरी इडली डोश्‍यासह हलव्याचा नाश्‍ता केला, असे सूत्रांनी सांगितले. अमित शहा मंगळवारपासून तीन दिवसांच्या लक्ष्यद्विपच्या दौऱ्यावर आले आहेत.

ज्येष्ठ फोल्क गायक पू यांचीही त्यांनी भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारापणामुळे अंथरुणाला खिळून असून, त्यांची भेट घेऊन त्यांच्या मुलीकडे शहा यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. काही विद्यार्थ्यांनीही शहा यांची भेट घेऊन चांगल्या शिक्षण आणि आरोग्य सेवेची मागणी केली. लोकसभा निवडणुकीत येथे पक्षाला चांगले यश मिळावे, या उद्देशाने भाजपने शहा यांचा हा दौरा आयोजित केला आहे.

Web Title: Amit Shah visits homes of fishermen, folk singer