शहांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही 'क्‍लीन चिट'

वृत्तसंस्था
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) विद्यमान अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात पुन्हा खटला चालविण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) नकार दिला. 2005 मध्ये झालेल्या चकमकीमध्ये गुजरात पोलिसांनी सोहराबुद्दीनला ठार केले होते. ‘अमित शहा यांनी दिलेल्या आदेशानुसार बनावट चकमक घडवून आणत सोहराबुद्दीनची हत्या झाली‘ असा आरोप शहा यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि 2014 मध्ये शहा यांना निर्दोष घोषित करण्यात आले होते.

सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात शहा यांची कोणतीही भूमिका नाही आणि राजकीय हेतूंमुळे त्यांना यात गोवण्याचा प्रयत्न झाला, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले होते. मात्र, सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातील शहा यांच्या ‘संशयास्पद‘ भूमिकेची पुन्हा चौकशी केली जावी, अशी मागणी हर्ष मंदेर या माजी अधिकाऱ्याने केली होती. या याचिकेची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयासमोर झाली. 

‘या प्रकरणाशी मंदेर यांचा दूरूनदेखील काहीही संबंध नाही. शिवाय, यापूर्वी एकदा शहा यांच्याविरोधात या प्रकरणातील खटला चालला आहे. त्यात त्यांच्यावरील आरोप फेटाळण्यात आले आहेत,‘ असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

Web Title: Amit Shaha

टॅग्स