अमित शहा यांची विरोधकांवर टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

भुवनेश्वर : नोटाबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी घणाघाती टीका केल्यानंतर आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. शहा यांनी नोटाबंदीच्या निर्णयाची तुलना महानदीला आलेल्या पुराशी केली. विरोधक हे पुरात सापडलेल्या केळीच्या झाडावर बसलेले मांजर, उंदीर, साप आणि मुंगूस असल्याचेही ते म्हणाले.

येथे आयोजित सभेत बोलताना शहा म्हणाले की, कल्पना करा की महानदीला पूर आलेला आहे आणि या पुरापासून बचाव करण्यासाठी मांजर, उंदीर, साप आणि मुंगूसाने एका केळीच्या झाडाचा आधार घेतला आहे. हे सर्व जण पूर ओसरण्याची वाट पाहात आहेत. त्याचप्रमाणे विरोधकांची अवस्था झालेली आहे. कॉंग्रेस, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, मायावती आणि मुलायमसिंह यादव हे झाडावर चढून बसले आहेत आणि नोटाबंदीचा पूर ओसरण्याची वाट पाहात आहेत.

डॉ. मनमोहनसिंग यांनी केलेल्या टीकेबद्दल बोलताना शहा म्हणाले की, ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनाच नोटाबंदीच्या निर्णयाचा त्रास होतो आहे. मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

Web Title: Amit Shaha lashes out at opposition parties