शहांच्या सुरक्षेचा तपशील सांगण्यास आयोगाचा नकार

वृत्तसंस्था
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सुरक्षेवरील खर्चाचा तपशील आज केंद्रीय माहिती आयोगाने सुरक्षेच्या आणि गोपनीयतेच्या कारणास्तव सांगण्यास नकार दिला.

 नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सुरक्षेवरील खर्चाचा तपशील आज केंद्रीय माहिती आयोगाने सुरक्षेच्या आणि गोपनीयतेच्या कारणास्तव सांगण्यास नकार दिला.

माहिती अधिकाराच्या कायद्याखाली अमित शहांच्या सुरक्षा व्यवस्था आणि खर्चाची विचारणा एका याचिकेद्वारे करण्यात आली होती. 5 जुलै 2014 रोजी दीपक जुनेजा यांनी याचिका दाखल केली होती. त्या वेळी शहा राज्यसभेचे सदस्य नव्हते.

याशिवाय सरकारतर्फे कोणकोणत्या व्यक्तीला सुरक्षा पुरवण्यात आली आहे, याचीदेखील माहिती मागवली होती; परंतु माहिती आयोगाने सुरक्षेचा तपशील सांगण्यास नकार दिला. 

Web Title: Amit Shahs Security Expenses Cant Be Disclosed Says RTI Authority

टॅग्स