बिग बी ने दिला “चलो इंडिया" मोहिमेला पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

''चलो इंडिया'' ही अग्निसुरक्षेच्या दिशेने जाणारी एक चळवळ आहे. ही संकल्पना मॅड एन क्रेझी मिडियानॉमिक्स प्राइवेट लिमिटेड यांनी संकल्पित केली आहे आणि महाराष्ट्र अग्निशमन सेवा नागरिक कल्याण संस्थेने याची सुरवात केली आहे.

बॉम्बे डॉकमध्ये घडलेल्या त्या भयंकर धमक्याला काल ७५ वर्षे पूर्ण झाली. १४ एप्रिल १९४४ ला लागलेल्या त्या भीषण आगीत ८०० ते १३०० लोकांनी आपला जीव गमवला होता आणि ८०,००० लोकांना आपल्या डोक्यावरचे छप्पर गमवावे लागले होते, या आगीशी लढताना अग्निशामक दलाचे ६६ साहसी सदस्य मृत्यूमुखी पडले.      

तेव्हापासून ते आतापर्यंत, म्हणजे आजच्या आधुनिक काळात अग्नि सुरक्षेचे महत्व फार बदलले आहे. आगीशी लढणाऱ्या अनेक अग्निशामकांनी मोठ्या साहसाने आपले कर्त्यव्य निभावताना आपल्या जीवाचे बलिदान दिले. 

यानंतर देखील सतत आपलयाला ऐकायला येत असते की आग दुर्घटनेत कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले, कशाप्रकारे त्यांच्या कुटुंबांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले, बहुमूल्य संपत्तीचं नुकसान झालं आणि आगीमुळे व्यवसायाची शक्यता नष्ट झाली. जागरूकता आणि सावधगिरीमुळे अशा घटना टाळता येऊ शकतात. ह्यामध्ये एक मोठा बदल घडवण्यासाठी आणि विविध सावधगिरीच्या सुरक्षीततेबद्दल सामान्य माणसांस जागरूक आणि प्रशिक्षित करण्यासाठी हे एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे.

या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांनी सर्व भारतीयांना हात जोडत याचना केली आणि अग्निसुरक्षा मार्ग निवडण्याची विनंती केली, तसेच या प्रसंगी अग्नि सुरक्षा गौरवगीत "चलो इंडिया अब साथ चले हम" चे अनावरण करण्यात आले.

''चलो इंडिया'' ही अग्निसुरक्षेच्या दिशेने जाणारी एक चळवळ आहे. ही संकल्पना मॅड एन क्रेझी मिडियानॉमिक्स प्राइवेट लिमिटेड यांनी संकल्पित केली आहे आणि महाराष्ट्र अग्निशमन सेवा नागरिक कल्याण संस्थेने याची सुरवात केली आहे. याला महाराष्ट्र अग्निशमन सेवा, नागरी विकास 2 (महाराष्ट्र सरकार) आणि भारत सरकारचे अग्निशमन सल्लागार (फायर एडवाइज़र) यांचे समर्थन मिळाले आहे.

मुंबई राजभवनातही याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

Web Title: Amitabh Bacchan supports Chalo India campaign