अमिताभ खरंच महानायक; हुतात्मा कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

मुंबई : बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांनी दानशूरपणा दाखवत पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या प्रत्येक कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी केलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याबद्दल देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत असून, अनेकांनी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतही जाहीर केली आहे. बॉलिवूडमधून हल्ल्याचा निषेध करण्यात आल्यानंतर आता महानायक अमिताभ बच्चन जवानांच्या कुटुबीयांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

अमिताभ यांच्या प्रवक्त्याने सांगितले, की हो, अमिताभजी हुतात्मा झालेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देणार आहेत. त्यासाठी ते योग्य प्रक्रिया शोधत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amitabh Bachchan helps 5 crores for Martyards children who dies in Pulwama attack