मित्र अमरसिंह यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन झाले निःशब्द

amitabh amar singh
amitabh amar singh

नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही पार पडली होती. त्यानंतर आता शनिवारी त्यांच्या निधनाचे वृत्त आले. अमर सिंह यांच्या निधनानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर त्यांचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये मान झुकलेल्या अवस्थेत बिग बी दिसत आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी काहीच कॅप्शन दिलेला नाही. 

अमर सिंह आणि बच्चन कुटुंबियांचे जवळचे संबंध आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात अमर सिंह यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांची माफीही मागितली होती. 90 च्या दशकात अमिताभ बच्चन अडचणीत आले होते. त्यांच्या कंपनीचं दिवाळं निघालं होतं तेव्हा अमर सिंह धावून आले होते. इतर सर्वांनी अमिताभ बच्चन यांना मदत नाकारली होती तेव्हा अमर सिंह यांनी हात दिला होता. 

अमर सिंह आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये 2010 पासून दरी निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. अमर सिंह यांनी समाजवादी पक्षामध्ये बंडखोरी केली तेव्हा बच्चन कुटुंबिय त्यांच्यासोबत राहिले नाही. त्यावेळी अमर सिंह यांना अपेक्षा होती की जया बच्चनसुद्धा पक्ष सोडतील. मात्र त्याऐवजी जया बच्चन यांनी अमर सिंग यांच्यावरच निशाणा साधला. त्यानंतर अमर सिंहसुद्धा सातत्याने अमिताभ आणि जया बच्चन यांना टार्गेट करत असायचे.  

हे वाचा - राज्यसभा खासदार अमर सिंग यांचे निधन

महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी असलेले कौटुंबिक संबंध बिघडत गेले होते. दरम्यान, सिंगापूरमध्ये उपचार घेत असलेल्या अमरसिंह यांचा फोटो शेअर करून, बच्चन यांनी त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यानंतर अमर सिंह राजकारणातही ते फारसे सक्रीय नव्हते. 5 जुलै 2016 मध्ये त्यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली होती. दरम्यान, आजारी पडण्याआधीच त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही राज्यसभेपासूनच झाली होती. 1996 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभा खासदार झाले होते. त्यानंतर 2002 आणि 2008 मध्येही ते राज्यसभेचे खासदार झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com