बच्चन यांनी केली राहुल गांधींना फॉलो करण्यास सुरवात

Amitabh Bachchan
Amitabh Bachchan

मुंबई : बॉलिवूड शहेनशहा यांचे ट्विटरवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असले तरी फार मोजक्या लोकांना फॉलो करतात. आता या यादीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांचाही समावेश झाला आहे.

बच्चन यांच्याकडून सर्व काँग्रेस नेत्यांना फॉलो करण्यास सुरवात केल्याने तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. बच्चन यांनी राहुल गांधी यांच्या 'ऑफिस ऑफ आरजी' या ट्विटर अकाउंटला फॉलो केल्यानंतर पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, अहमद पटेल, अशोक गहलोत, अजय माकन, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट आणि सी. पी. जोशी यांना या महिन्यातच फॉलो करण्यास सुरवात केली आहे.

बच्चन हे नेहरू-गांधी कुटुंबीयांच्या खूप जवळ होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे ते चांगले मित्र होते. ते सध्या गुजरातचे ब्रँड ऍम्बेसिडरही आहेत. बच्चन यांचे ट्विटरवर 33.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर, ते फक्त 1689 जणांना फॉलो करतात. काँग्रेस नेत्यांसह नुकतेच त्यांनी लालूप्रसाद यादव, मिसा भारती, नितीश कुमार, सिताराम येचुरी, ओमर अब्दुल्ला, सुप्रिया सुळे यांनाही फॉलो करण्यास सुरवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com