हुतात्मा जवानांच्या नातेवाईकांना अमिताभ देणार 2 कोटी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 जून 2018

पोलियो निवारण, टीबी निरोधक अभियान आणि स्वच्छ भारत अभियान या सर्व अभियानाच्या जाहिराती अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी केल्या आहेत. 

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनी भारतीय लष्करातील हुतात्मा जवानांच्या पत्नी आणि देशातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी आर्थिक मदत करणार आहेत. या सर्वांसाठी अमिताभ बच्चन 2 कोटी रूपयांची आर्थिक मदत करणार आहेत. तसेच इतर सामाजिक कार्यातही ते सहभाग घेणार आहेत. 

पोलियो निवारण, टीबी निरोधक अभियान आणि स्वच्छ भारत अभियान या सर्व अभियानाच्या जाहिराती अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडून या सर्वांसाठी एकूण 2 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. यामध्ये एक कोटी हुतात्मा जवानांच्या पत्नी आणि एक कोटी शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहेत. नव्या भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करण्यासाठी अमिताभ आर्थिक मदत करणार आहेत.

अमिताभ बच्चन यांच्यानुसार शेतकरी आणि भारतीय लष्करातील जवान हे समाजातील महत्वपूर्ण घटक आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांच्याबाबत गर्व असायला हवा आणि अशा लोकांना दुर्लक्ष करायला नको.

दरम्यान, यापूर्वीही अमिताभ बच्चन यांनी आंध्रप्रदेश आणि विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज परतफेड करण्यास मदत केली. मात्र, अमिताभ बच्चन यांनी याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Web Title: Amitabh Bachchan Will Donate 2 Crore Rupees To Help Indian Army Martyrs Widows And Farmers