अमिताभ "फेसबुक'वरील सर्वांत व्यग्र अभिनेते 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

सुपरस्टार अमिताभ बच्चन हे "फेसबुक'वर सर्वांत व्यग्र असणारे भारतीय अभिनेते ठरल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. अमिताभ यांचे फेसबुकवर तीन कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.

मुंबई : सुपरस्टार अमिताभ बच्चन हे "फेसबुक'वर सर्वांत व्यग्र असणारे भारतीय अभिनेते ठरल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. अमिताभ यांचे फेसबुकवर तीन कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.

"स्कोअर ट्रेंड्‌स'ने केलेल्या या सर्वेक्षणात अमिताभ यांना शंभर पॉइंट मिळाले असून, त्यांच्यानंतर सलमान खान (95 पॉइंट), शाहरुख खान (68 पॉइंट), रणवीरसिंग (52 पॉइंट) आणि अक्षयकुमार (49 पॉइंट) या अभिनेत्यांचा क्रमांक लागतो. अमिताभ हे फेसबुकवर प्रचंड लोकप्रिय असून, त्यांच्या प्रत्येक पोस्टची दखल घेतली जाते.

Web Title: Amitabh is most embarrassing actor on Facebook