'जन धन' खात्यांमधील रकमेत सातत्याने वाढ 

पीटीआय
सोमवार, 22 एप्रिल 2019

जन धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या बॅंक खात्यांमधील रक्कमेत सातत्याने वाढ होत आहे.

नवी दिल्ली (पीटीआय) : जन धन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या बॅंक खात्यांमधील रक्कमेत सातत्याने वाढ होत असून, ही रक्कम लवकरच 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जनधन योजनेअंतर्गत आतापर्यंत 35.39 कोटींपेक्षा अधिक बॅंक खाती उघडण्यात आली आहेत. 3 एप्रिलपर्यंत या खात्यांवर एकूण 97 हजार 665 कोटी रुपये शिल्लक होते. 27 मार्चपर्यंत हा आकडा 96 हजार 107 कोटी रुपये होता. तर त्याआधी आठवडाभरापूर्वी तो 95 हजार 382 कोटी रुपये खात्यांवर होते. आतापर्यंत सुमारे 27.89 कोटी खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड वितरित करण्यात आली आहेत.

दरम्यान, योजनेच्या यशानंतर 28 ऑगस्ट 2018 नंतर खाते उघडलेल्या नागरिकांना मिळणारी अपघाती विम्याची रक्कम सरकारने 1 लाखांवरून 2 दोन लाख रुपये केली असून, ओव्हर ड्राफ्टची मर्यादाही 10 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती. महिला खातेधारकांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असून, जवळपास 59 टक्के खातेधारक हे ग्रामीण व निमशहरी भागातील आहेत. 

Web Title: The amounts of Jan Dhan scheme has consistently increased