Amritpal Singh: खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहला अटक, मात्र...

फरार खलिस्तानी नेता अमृतपाल सिंह अजूनही फरार असल्याचा दावा पंजाब पोलीस करत आहे.
Amritpal Singh
Amritpal Singh

फरार खलिस्तानी नेता अमृतपाल सिंह अजूनही फरार असल्याचा दावा पंजाब पोलीस करत आहे. मात्र अमृतपालला अटक करण्यात आल्याचं 'वारिस पंजाब दे' संघटनेच्या वकीलाचा दावा आहे.(Amritpal Singh arrested by police claims legal advisor to Waris Punjab De)

'वारिस पंजाब दे' संघटनेचे वकील इमान सिंह खारा यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंहला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. त्याला शाहकोट पोलीस ठाण्यात अटक केल्याचा दावा वकीलाने केला आहे. तसेच पोलीस त्याचा एन्काऊंटर करु शकतात, असा आरोपही वकिलांनी केला आहे.

Amritpal Singh
Amritpal Singh : 'अमृतपाल'विरोधात नवीन एफआयआर; 'त्या' सात जणांना 23 मार्चपर्यंत कोठडी

मात्र, खलिस्तानी नेता अमृतपाल सिंह अजूनही फरार असून त्याला पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु असल्याचं पंजाब पोलिसांनी सांगितलं आहे.

Amritpal Singh
Amritpal Singh : 'पंजाबने खूप सहन केलं, पण आता नाही..; अकाल तख्तचा इशारा

खलिस्तान समर्थक आणि 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहला पंजाब पोलिसांनी फरार घोषित केलं. पंजाबमध्ये खलिस्तान समर्थक अमृतपालसिंगचा शोध आज चौथा दिवस आहे. जलंधर परिसरात शोधमोहिम सुरु आहे.

पोलिसांनी शनिवारी म्हणजेच 18 मार्चपासून अमृतपाल सिंह आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई सुरू केली आहे. अमृतपाल सिंह अद्यापही फरार असल्याचं पंजाब पोलिसांचं म्हणणं आहे.

Amritpal Singh
Amritpal Singh: पळपुटा अमृतपाल कुठे आहे? लास्ट लोकेशन झालं ट्रेस

पोलिसांनी पहिल्यांदा २३ फेब्रुवारी रोजी अजनालाप्रकरणी अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी शनिवारी त्याच्या सात सहकाऱ्यांना जालंधरच्या मेहतपूरजवळ ताब्यात घेतलं. त्या सात जणांना आता २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com