Amritpal Singh: पळपुटा अमृतपाल कुठे आहे? लास्ट लोकेशन झालं ट्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amritpal Singh

Amritpal Singh: पळपुटा अमृतपाल कुठे आहे? लास्ट लोकेशन झालं ट्रेस

पंजाबमध्ये खलिस्तान समर्थक अमृतपालसिंगचा शोध रविवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. पंजाब पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी राज्यात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे. शनिवारी 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल याला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो पोलिसांच्या हातून निसटण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे. पळपुटा अमृतपाल कुठे आहे? यासंदर्भात माहिती समोर आली आहे. (Amritpal Singh last location trace Punjab Police )

दरम्यान, अमृतपालचे वडील तरसेम सिंग यांना अमृतपाल संदर्भात विचारले असता, त्यांना त्यांचा मुलगा कुठे आहे हे माहिती नसल्याचे स्पष्ट सांगितल. तसेच, मला स्वतः अमृतपालबद्दल काही योग्य माहिती मिळवायची आहे. पोलिसांनी त्यांच्या घरात ३ ते ४ तास शोधमोहीम राबवल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, त्याचे शेवटचे लोकेशन शाहकोटजवळ सापडले असल्याची अपडेट समोर आली आहे.

अमृतपालच्या अटकेची माहिती शनिवारी दुपारी आली, मात्र पोलिसांनी रात्री उशिरा जारी केलेल्या अधिकृत प्रेस स्टेटमेंटमध्ये तो फरार असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी 'वारीस पंजाब दे' संघटनेशी संबंधित 78 जणांना अटक केली आहे.

…मग तेव्हा अटक का नाही केली?

एएनआय’शी बोलताना तरसेम सिंग म्हणाले, अमृतपाल सिंग फरार आहे, त्याला अटक केलीय याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती नाही. पोलिसांनी आमच्या घरी येत ३ ते ४ तास छाडाछडती घेतली. तेव्हा पोलिसांनी बेकायदेशीर असं काहीच सापडलं नाही. पण, अमृतपालबाबत पोलिसांनी आम्हाला माहिती द्यावी,” अशी मागणी तरसेम सिंग यांनी केली.

दोन एसएसपी लेव्हलचे अधिकारी घरी आले होते. त्यांनी सांगितलं की, अमृतपाल सिंगला अटक करायची आहे. मग, जेव्हा ८-८.३० वाजता अमृतपाल सिंग घरातून गेला तेव्हा का अटक केली नाही?, असा सवाल तरसेम सिंग यांनी पंजाब पोलिसांना विचारला आहे.