Amritpal Singh : अमृतपालची पत्नी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात; सुरक्षा यंत्रणांनी पकडलं

Amritpal Singh : अमृतपालची पत्नी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात; सुरक्षा यंत्रणांनी पकडलं

चंदीगडः खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याचा १८ मार्चपासून पोलिस शोध घेत आहेत. आज अमृतपालच्या पत्नीला इमिग्रेशनने विमानतळावर रोखलं. सथ्या तिची चौकशी सुरु असून अद्याप तिच्या अटकेच्या कारवाईबद्दल अपडेट मिळालेले नाहीत.

मीडिया रिपोर्टनुसार अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीपला चेक इन करतांना अडवलं. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. किरणदीप कौर ही बर्मिंघमला चालली होती.

हेही वाचाः What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

लूक आऊट सर्क्युलर सुरु असल्याने इमिग्रेशनने तिला जाण्यास परवानगी न देता ताब्यात घेतलं. आज सकाळी ११.४० वाजता अमृतसर एअरपोर्टवर ती पोहोचली होती. किरणदीपची फ्लाईट १ वाजता होती. ती यूकेला रवाना होणार होती. परंतु तपासणीमध्ये पकडल्याने ती पुढे जाऊ शकली नाही.

मागच्या वर्षीच किरणदीप आणि अमृतपालचं लग्न झालं होतं. ती कुठल्यातरी ऑनलाईन संस्थेसाठी काम करते. तिचं कुटुंब जालंधर येथील आहे. परंतु सध्या ते लंडन येथे वास्तव्याला आहे. माहितीनुसार किरणदीप ही आपल्या नातेवाईकांकडे जाण्याच्या तयारीत होती.

पंजाब पोलिसांनी 15 एप्रिल रोजी सरहिंद येथे जोगा सिंह याला ताब्यात घेतलं. तो अमृतपालचा मुख्य सहकारी होता. अमृतपाल सिंग याचा प्रमुख सहकारी जोगा सिंह याला सरहिंद येथून ताब्यात घेतलं आहे. हा तो व्यक्ती आहे ज्याने अमृतपाल फरार झाल्यांतर १८ मार्च रोजी त्याला आसरा दिला होता.

अमृतपाल १८ मार्चपासून फरार

पंजाब पोलिसांनी १८ मार्च रोजी खलिस्तान समर्थक आणि त्यांच्या साथीदारांवर कारवाई सुरू केल्यापासून अमृतपाल आणि पपलप्रीत फरार होता. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे, खुनाचा प्रयत्न, पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आणि सरकारी अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्यात अडथळा आणणे यासह विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com