अमृतसर हल्ल्यातील ग्रेनेड पाकिस्तानमधील

Amritsar bomb blast: First sketch of suspects released
Amritsar bomb blast: First sketch of suspects released

चंदीगढ : पंजाबमध्ये निरंकारी संमेलनात झालेल्या बॉम्बस्फोटांतील ग्रेनेड हे HE-36 सीरिजचे असून, या प्रकारचे ग्रेनेड हे पाकिस्तानी लष्कर वापर आहे, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. ग्रेनेड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज पंजाबसह देशभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. शिवाय, हल्ल्यातील संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

पंजाबमध्ये निरंकारी संमेलनात झालेल्या बॉंबस्फोटांमुळे पंजाब सोबतच केंद्र सरकारही हादरले आहे. या स्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्येदेखील अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

पंजाबमध्ये दहशतवादाच्या पुनरुज्जीवनाचा पाकिस्तानचा सातत्याने प्रयत्न सुरू असून, गेल्या काही महिन्यांत धार्मिक नेत्यांवर हल्ला करून जातीय तेढ निर्माण करण्याचे षड्‌यंत्र राबविले जात आहे. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी अलीकडेच पंजाबमधील अशांततेबद्दल जाहीर इशारा दिला होता. त्याच दोन दिवसांपूर्वी पठाणकोटच्या मार्गाने दहशतवादी दाखल झाल्याच्या बातम्यांनी सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली होती. त्यानंतर अमृतसरपासून अवघ्या पाच किलोमीटरवरील निरंकारी आश्रमात बॉंबस्फोट झाला. आश्रमात सत्संगासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जमले असताना झालेल्या या बॉंबस्फोटांमुळे तीन जणांना प्राण गमवावे लागले असून, अनेक जण जखमी झाले आहेत.

अमृतसरमधील हल्ला पाकिस्तानातून घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर गृहमंत्रालयात महत्वाची बैठक पार पडली आहे, रॉ, आयबीसह गृहमंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकारी याबैठकीला उपस्थित होते. पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमेवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. एनआयएची 3 सदस्यीय समितीने घटनास्थळी जाऊन तपासणी केली. हल्लेखोरांबद्दल माहिती देणाऱ्यास 50 लाख रुपये बक्षीसाची घोषणाही पंजाब सरकारने केली आहे. काही दिवसापूर्वी पंजाबमध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेचे दहशतवादी घुसल्याची आणि अल-कायदा कमांडर जाकिर मुसाच्या हालचालींची माहिती मिळाली होती. मुसा अमृतसरमध्ये असल्याची माहिती मिळताच, पंजाब पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

राजनाथसिंह यांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
अमृतसरमधील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज पंजाबसह देशभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पंजाबमध्ये काल झालेला ग्रेनेड हल्ला हा दहशतवादी संघटनांकडून करण्यात आल्याचा दावा केला जात आहे, त्या पार्श्वभूमीवर देशातील सुरक्षा व्यवस्थेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालय आणि सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजनाथसिंह यांना माहिती दिली. अमृतसरमध्ये निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामुळे गृहमंत्रालयासह सुरक्षा दले दक्ष झाली असून, राजधानी दिल्लीत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com