जीन्स, टी-शर्ट 'असभ्य' पेहराव ; अमृतसर महाविद्यालय

वृत्तसंस्था
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

अमृतसर : महाविद्यालयात जीन्स, टी-शर्ट, स्कर्ट आणि केप्रिस परिधान करणे हा 'असभ्य' पेहराव असल्याचे सांगत पंजाबच्या अमृतसर वैद्यकीय महाविद्यालयाने या कपड्यांवर बंदी आणली आहे. ही बंदी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दैनंदिन कालावधीत आणि परीक्षेदरम्यान घालण्यात आली आहे. महाविद्यालयातील मुलींसह मुलांसाठीही ही बंधने असणार आहेत.

पंजाब सरकारच्या अखत्यारित असलेल्या अमृतसर वैद्यकीय महाविद्यालयात ही बंदी लावण्यात आली आहे. त्यानुसार महाविद्यालय परिसरात टी-शर्ट, स्कर्ट, केप्रिस आणि जीन्स परिधान करून वावरता येणार नाही. महाविद्यालय प्रशासनाने ही बंदी लागू केली असून, 1 ऑक्टोबरपासून हे अमलात येणार आहे. याबाबतची लेखी सूचना महाविद्यालयाच्या विविध विभागात लावण्यात आली आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्या सुजाता शर्मा यांनी महाविद्यालयातील शिक्षकांना हा आदेश अमलात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जर कोणताही विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी या नव्या नियमाचे उल्लंघन करेल, अशा विद्यार्थ्यावर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले. मात्र, ही बंदी फक्त नियमित लेक्चरवेळी लागू केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 
 
Web Title: Amritsar medical college bans skirts jeans t shirts for both boys and girls