अमृतसर रेल्वे दुर्घटना 'मानवाधिकार'ची नोटीस 

पीटीआय
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : अमृतसरजवळ रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांना रेल्वेने चिरडल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड अध्यक्ष व पंजाब सरकारला नोटिसा बजावल्या असून आगामी चार आठवड्यांत नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले आहे. 

अमृतसरजवळील जोडा रेल्वे फाटकाजवळ दसऱ्याच्या दिवशी झालेल्या या दुर्घटनेत 62 लोकांनी प्राण गमावले होते. अनेक लोक रेल्वे रूळांवर उभे राहून रावण दहनाच्या सोहळ्याचे चित्रीकरण करत होते किंवा तो पहात होते. त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या रेल्वेने शेकडो जणांना चिरडले. 62 जणांचा मृत्यू झाला व अनेक जण रुग्णालयात गंभीर स्थितीत भरती आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन व पंजाब सरकारमध्ये जबाबदारीच्या ढकलाढकलीचा खेळ सुरू झाला. 

रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी, "रेल्वेने चौकशी कशाची करायची?' असे सांगून रेल्वेचा यात दोष नसल्याची भूमिका पहिल्याच दिवशी मांडली होती. या दुर्घटनेमागील मुख्य दोषी कोण हे पाच दिवसांनंतरही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळेच ही जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी मानवाधिकार आयोगाने तिन्ही संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. आयोगाने पंजाब सरकार, रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालयाकडून चार आठवड्यांत दुर्घटनेबद्दलचा विस्तृत अहवाल मागविला आहे. 

Web Title: Amritsar train accident Human Rights commission sent notice